पीएम नरेंद्र मोदी हा बहुचर्चित हिंदी चित्रपट येत्या ६ एप्रिलला प्रदर्शित होणारे आहे तसेच या चित्रपटावर लावलेल्या बंदी विरोधात हायकोर्टाने स्थागिती दिलेली आहे. त्यामुळे ह्या चित्रपटाचा प्रदर्शित होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. लोकसभा निवडणूक आणि आचारसंहितेच कारण देत ‘पीएम मोदी चित्रपटा विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. हा चित्रपट निवडणुकीनंतर प्रदर्शित करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शकरीत्या पार पडाव्यात यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे करण्यात आलेली होती. चित्रपटाला विरोध नाही, परंतु हा चित्रपट ऐन निवडणुकीच्या काळात प्रदर्शित करण्यात येत आहे. त्यामुळे तो निवडणूक निकालानंतर प्रदर्शित करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने हे कारण ग्राह्य न मानता याचिका फेटाळली आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे २३ भाषांत पोस्टर लाँच करण्यात आले होते. या चित्रपटामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे तर ओमंग कुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
आज चित्रपटाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांची देशभक्तीची छबी दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. परंतु निवडणुकीच्या काळात हा चित्रपट दाखविला तर यामुळे विरोधकांच्या मतांवर सुद्धा परिणाम होऊ शकतो ही भीती असल्यामुळेच विरोधाकांनी हा चित्रपट न दाखविण्यासाठी कोर्टात याचीका दाखल केली होती परंतु या चित्रपटाशी आणि निवडणुकीचा काही संबंध जोडता येत नाही असे सुद्धा कोर्टाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या ६ एप्रिलला संपूर्ण देशात हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.