Skip to content Skip to footer

महाआघाडीच्या कळा ह्या गर्भपाताच्या नसून वांझोटेपनाच्या आहेत – उद्धव ठाकरे

भाजपा अमित शहा यांचा गांधी नगर येथे मतदार संघात अर्ज भरण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गेल्यामुळे अनेक पक्षाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलेले आहे. आपल्या सामना या मुखपत्रातून महाआघाडीच्या नेत्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे बोलेल की, आमच्या भेटीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी कोल्हय़ांच्या पोटात दुखू लागले आहे. या कळा गर्भारपणाच्या नसून वांझोटेपणाच्या आहेत. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महाआघाडी पक्षांवर टीका केली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या खास निमंत्रणावरून आम्ही गांधीनगरात गेलो. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायचा हे एक निमित्त होते, पण त्यानिमित्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ‘वज्रमूठ’ दाखवणे हा मुख्य हेतू होता. त्याचा परिणाम असा झाला की, काँग्रेस-राष्ट्रवादी कोल्हय़ांच्या पोटात दुखू लागले आहे. या कळा गर्भारपणाच्या नसून वांझोटेपणाच्या आहेत. कळा इतक्या पराकोटीच्या आहेत की, जनता त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केल्याशिवाय राहणार नाही.

आमचे व्यवस्थित जुळले व सर्व कटुता विसरून आम्ही महाराष्ट्र व देशहितासाठी एकत्र आलो. त्यामुळे काहींना जी पोटदुखी लागली आहे त्यावर सध्या तरी उपचार नाही आहे असे सुद्धा मत उद्धव ठाकरे यांनी मांडलेले आहे. तसेच सध्या भाजपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे पहिल्यांदाच गांधी नगर गुजरात या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्यामुळे तिथे महायुतीचीही ताकद दाखवण्यासाठी आपण गेले होते असे सुद्धा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5