डॉ. अमोल कोल्हे यांचे शिरूर मतदार संघात खोटे आश्वासन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी भोळ्या-भाबड्या जनतेला अनेक आश्वासन देत असतात. आज महाराष्ट्रातील आणि बैलगाडा मालकांचा जिवाळ्यचा विषय बनलेल्या बैल-गाडा शर्यत ही जत्रा आणि यात्रा यामध्ये बैलगाडी शर्यतीचे आकर्षण असते. बैलगाडा घाटात मालकाचे नाव उंचावून ठेवणारी ही बैलगाडा शर्यत आता बंद पडली आहे. परंतु सध्या राष्ट्रवादीचे शिरूर मतदार संघातील उमेदवार अमोल कोल्हे हे विभागातील शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देताना दिसत आहे. आपण सत्तेत आल्यावर बैल-गाडा शर्यत चालू करण्यासाठी आवाज उठवू असे शेतकऱ्यांच्या भावनेच्या मुद्यावरून राजकारण करताना दिसत आहे.

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी बैलगाडा मालकांनी अनेकदा आंदोलनं केली. मात्र बैलगाडा शर्यतबंदीचा लढा न्यायालयात असल्याने त्यांचे आंदोलन यशस्वी ठरलेलं नाही. या बैल-गाडा शर्यतीसाठी आंदोलन करणारे शिरूर मतदार संघातील खासदार अढळराव पाटील यांनी संसदेत सुद्धा अनेक वेळा बैलगाडा शर्यती बद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. त्याबद्दल देशातील सर्व खासदारानी एकत्र येऊन बैलगाडा शर्यती बद्दल अध्यादेश काढावा असे सुद्धा संसदेत मांडले होते आणि अजून सुद्धा ह्या विषयावर त्यांचा लढा चालू आहे. परंतु फक्त निवडून येण्यासाठी जनतेला काही आश्वासने देण्याचे काम कोल्हे करताना दिसून येत आहे.

अभिनेता असलेल्या कोल्हे यांनी या मुद्याचं राजकारण न करता मालिकेच्या माध्यमातून नागरिकांचं मनोरंजन करावं असा खोचक टोला विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला आहे. फक्त मतांच्या राजकारणासाठी बैलगाडा या बद्दलची माहिती नसणाऱ्या कोल्हे यांनी या विषयांचे राजकारण करू नये असेच आज शिरूर मतदार संघातील जनता सुद्धा बोलत आहे. मागील वर्षा पासून या शर्यती चालू करण्यासाठी कोर्टात सुद्धा लढा देताना खासदार पाटील दिसत असताना कोल्हे फक्त या बैलगाडा शर्यतीचे राजकारण करताना दिसत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here