लोकांच्या जमिनी घेवून पेट्रोल पंप, हॉटेल आणि मल्टीप्लेक्स उभारले नाहीत, केसरकरांची राणेंवर टीका

लोकांच्या जमिनी घेवून पेट्रोल पंप, हॉटेल आणि मल्टीप्लेक्स उभारले नाहीत, केसरकरांची राणेंवर टीका

राणे आणि त्यांच्या मुलांची स्थिती केविलवाणी झाली असून त्यांनी स्वत:च्या मानसिक स्थितीवर कंट्रोल ठेवावा असा सल्ला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना दिला आहे. ते सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, ‘राजकारणात सातत्याने पराभवाचा सामना करावा लागल्याने नारायण राणेंना नैराश्य आले आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे म्हणत दीपक केसरकर यांनी राणेंवर सडकून टीका केली. केसरकर यांनी केलेल्या टीकेला आता नारायण राणे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला होता. ‘पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर हे निष्क्रीय आहेत,’ असे म्हणत राणेंनी टीका केली होती. राणेंनी केलेल्या या टीकेचे केसरकरांनी व्याजासकट परतफेड केली. केसरकर म्हणाले, मी निष्क्रिय आहे, हे मला मान्य आहे. कारण मी लोकांच्या जमिनी घेवून पेट्रोल पंप, हॉटेल आणि मल्टीप्लेक्स उभारले नाहीत, असे केसरकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here