शिवसेनेचा उपक्रम १० वीच्या विध्यार्थ्यांना सरावप्रश्न पत्रिकेचे वाटप

शिवसेनेचा-उपक्रम-१०-वीच्-Shiv Sena-Activities-A-Vich

शिवसेनेचा उपक्रम १० वीच्या विध्यार्थ्यांना सरावप्रश्न पत्रिकेचे वाटप

१० वीच्या वार्षिक परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही दिंडोशी विधानसभा मानतदार संघातर्फे १६ शाळांमधील तब्बल १५०० गरजू विध्यार्थ्यांना मोफत प्रश्नसंचाचे वाटप करण्यात येणार आहे. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्यातर्फे सईबाई विद्यालय येथे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. दहावीत शिकणाऱ्या गोरगरीब विध्यार्थ्यांना मोठ्या क्लास प्रमाणे सराव प्रश्नपत्रिका विकत घेता येणे शक्य होत नाही. त्यामुळे हे विध्यार्थी हुशार असून सुद्धा चांगले मार्क बोर्डाच्या परीक्षेला घेऊ शकत नाही.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, आमदार प्रभू यांच्या संकल्पनेतून तथा युवासेना, भारतीय विध्यार्थी सेना यांच्या वतीने विभागातील दहावीच्या विध्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांन मार्फत तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता पूर्व सराव प्रश्न पत्रिकेचे संच वाटप करण्यात येत आहे. यात प्रत्येक विषयाचे सात सराव प्रश्न पत्रिका संच असलेले पुस्तक देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here