अशोक चव्हाणांची इच्छा पूर्ण होणार, विखे पाटील परतणार स्वगृही

अशोक-चव्हाणांची-इच्छा-पू-Ashok-Chavan's-wish-before

अशोक चव्हाणांची इच्छा पूर्ण होणार, विखे पाटील परतणार स्वगृही

विधानसभा निवडणुकीचं तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक मतबल नेत्यांनी पक्षाला राम-राम करत भाजपा पक्षात प्रवेश केला होता. दोनच दिवसापूर्वी विजयसिह मोहिते पाटील यांनी जाहीर सभेत आपण अजून राष्ट्र्वादीत असल्याचे बोलून दाखविले होते. आता त्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते आणि आताचे भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा काँग्रेस पक्षात परतण्यासाठी कामाला लागलेले आहे. अशी माहिती कट्टा या वृत्तसंस्थेने दिलेली आहे.

भाजपाच्या हातातून सत्ता गेल्यानंतर आता पाडापाडीच्या राजकारणात कोणीकोमी कोणाला मदत केली असावी याची चाचपणी भाजप करत आहे. त्यामध्ये नगरमधून भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे पाटील कुटूंबावर पहिला निशाणा धरला आहे. कालच्या भाजपाच्या बैठकीतून बाहेर निघाल्यानंतर विखे शिंदे या दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या निर्णयावर समाधानी असल्याचे म्हटले असले तरी, भाजपात आपली डाळ फार काळ शिजू शकणार नाही याची प्रचिती राधाकृष्ण विखें पाटील यांना आली असावी असे म्हणता येईल. कारण, कट्टा या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, राधाकृष्ण विखे पाटील हे स्वगृही परतण्यासाठी कामाला लागले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे यांची एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विखे पाटील हे पुन्हा स्वगृही परतावे अशी इच्छा बोलून दाखवली होती. परंतु विखेंना पुन्हा पक्षात घ्यायचे किंवा नाही याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि केंद्रातील नेते मंडळी घेणार आहे. परंतु थोरात यांच्या बरोबर असलेले विखे यांचे संबंध पाहता विखेंना पक्षात घेण्यासाठी थोरातांचा विरोधात असणार आहे असेच चित्र दिसून येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here