खासदार ओमराजेंचा राणा पाटलांना जबरदस्त दणका

खासदार-ओमराजेंचा-राणा-पा-MP-Omarajancha-Rana-Pa

खासदार ओमराजेंचा राणा पाटलांना जबरदस्त दणका

धाराशिवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना जबर दणका दिला आहे. ओमराजेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राणा पाटील यांच्या ताब्यात असलेल्या कळंब पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला आहे. शिवसेनेच्या संगिता गोविंद वाघे यांना ९ मते तर संगिता माने यांना ७ मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या संगिता माने यांचा २ मतांनी विजय झाला आहे. उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे गुणवंत पवार यांची निवड झाली आहे.

दरम्यान, कळंब पंचायत समितीचे सदस्य पळवापळवी वरुन आ.राणा जगजीतसिंह पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरूद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, नगरमध्ये देखील महाविकास आघाडीने जोरदार प्रदर्शन करत राधाकृष्ण विखें पाटील यांच्या वर्चस्वाला दणका दिला आहे. ज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर स्थानिक निवडणुकांवर याचा मोठा परिणाम पडला असल्याचं दिसत आहे.

नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही महाविकासआघाडी दिसून आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजश्री चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसकडून प्रताप शेळके पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here