१५ लाख दिले नाहीत म्हणून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि रामदास आठवले यांच्यावर गुन्हा दाखल

१५-लाख-दिले-नाहीत-म्हणून-न-5-Lakh-Given-Not-As-Not

१५ लाख दिले नाहीत म्हणून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि रामदास आठवले यांच्यावर गुन्हा दाखल

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर रांचीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवरही जनतेची फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार १५ लाख रुपये दिले नाहीत म्हणून रांचीच्या कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. झारखंड उच्च न्यायालयाचे वकील आणि डोरंड येथील रहिवासी हरेंद्र कुमार सिंह यांनी हा खटला दाखल केला आहे. त्यावर न्यायिक दंडाधिकारी अजय कुमार गुडिया यांच्यासमोर सुनावणी झाली.

त्याशिवाय प्रत्येक वर्षी तीन लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही हेच आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी ५ फेब्रुवारी २०१५ रोजी शहा यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना हा चुनावी जुमला होता आणि केवळ निवडणुकीत बोलायचं म्हणून ही घोषणा केली होती, अशी कबुली दिली होती. त्यासाठी तक्रारदाराने २१ डिसेंबर २०१९ रोजी अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा हवाला देत या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here