आमदार योगेश कदम यांची मुगीज आदीवासी वाडीला दिली भेट

आमदार योगेश कदम यांची मुगीज आदीवासी वाडीला दिली भेट
शिवसेना आमदार योगेश रामदास कदम यांनी मतदार संघातील मुगीज येथील आदीवासी वाडीला भेट देऊन तेथील आदीवासी वाड्यातील जनतेशी संवाद साधला. आज आदीवासी बांधवाच्या उन्नत्तीसाठी तयार केलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम हे प्रत्येक प्रतिनिधीचे आहे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत असे मत यावेळी आमदार कदम यांनी बोलून दाखविले. तसेच शासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या घरकुल योजनेच्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांची पाहणी आणि तसेच समस्या देखील जाणून घेतल्या.

आदिवासी पाड्यात घरकुल अंतर्गत बांधलेल्या घरांची पाहणी सुद्धा कदम यांनी केली. आज आदीवासी पाड्यात जाणवत असलेल्या पाणी पुरवठेचा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन कदम यांनी दिले. तसेच आदिवासी भागांच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा बोलून दाखविले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here