‘आज के शिवाजी’ पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना – सामना

केंद्र-सरकारने-काम-करावे-The central government should work

‘आज के शिवाजी’ पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना – सामना

दिल्लीच्या भाजपा कार्यालयात ‘धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे एक पुस्तक प्रदर्शित करण्यात आले आहे. पुस्तकाचे नाव ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे आहे. या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर भाजपाकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पडदा टाकत सदर प्रकारांतून भाजपाने हात झटकले आहे. “या पुस्तकाशी भाजपाचा काही संबंध नाही”. असे त्यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे. परंतु या पुस्तकाच्या वादावरून शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडलेले आहे.

आता शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केले आहे. ‘आज के शिवाजी’ पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना असल्याची टीका शिवसेनेने ‘सामना’मधून केली आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. आता भाजपावाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. ११ कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची वावटळ उठली आहे, त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. ही वावटळ पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नाही हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांच्या पाठीमागे हे सर्व उद्योग सुरू आहेत. आज के शिवाजी नरेंद्र मोदी’असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले. त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात झाले. महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेला हे अजिबात आवडले नाही. श्री. मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, पण तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय? त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय? याचे उत्तर एका सुरात ‘नाही…नाही!’ असेच आहे. त्यांची तुलना जे शिवाजी महाराजांशी करतात त्यांना छत्रपती शिवाजीराजे समजलेच नाहीत, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

नाही तर भाजपाचे एकही कार्यालय ठेवणार नाही, संभाजी ब्रिगेडची धमकी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here