सिडकोने पोलिसांसाठी विशेष गृहप्रकल्प उभारावेत – एकनाथ शिंदे

सिडकोने-पोलिसांसाठी-विशे-Cidcone-for-the-police

सिडकोने पोलिसांसाठी विशेष गृहप्रकल्प उभारावेत – एकनाथ शिंदे

वांद्रे येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सभागृहात नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको या विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करतांना त्यात पोलिसांसाठी विशेष गृहबांधणी प्रकल्पांचा समावेश सिडकोने आपल्या धोरणात करावा, असे निर्देश दिले.

पोलीस १२ तास सेवा बजावतात शिवाय त्यांना घरी येण्या जाण्यासाठी किमान तीन-चार तासांचा प्रवास करावा लागतो. या सगळ्याचा परिणाम त्यांना सेवा बजावताना होतो म्हणून पोलिसांसाठी हक्काचे घर आवश्यक आहे. त्यामुळे सिडको नवी मुंबईत सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचे जे प्रकल्प उभारीत आहे त्यात पोलिसांसाठी विशेष तरतूद करावी. त्यासाठी धोरणामध्ये त्याचा समावेश केला जावा तसेच राज्यामध्ये पोलिसांसाठी घरे निर्मितीची संख्या देखील वाढली पाहिजे. महानगरांमध्ये विविध विकास प्राधिकरणाच्या मार्फत बांधल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पोलिसांसाठी घरे असली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

गृह बांधणी प्रकल्पातील बांधकामाचा दर्जा अधिक गुणवत्तापूर्ण कसा राहील त्याच बरोबर असे गृह प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यासाठी सिडकोने विशेष काळजी घ्यावी. समाजातील ज्या घटकांचे उत्पन्न मर्यादित आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतुन घर घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज दिले पाहिजे, असे आवाहन देखील बैठकी दरम्यान करण्यात आले. या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्त शितल तेली-उगले यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सांगली बंद मागे राजकीय षडयंत्र – खासदार सुप्रिया सुळे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here