मेगाभरती मुळेच भाजपा अपयशी, प्रदेशाध्यक्षांनी केले मान्य

मेगाभरती-मुळेच-भाजपा-अपय-Megabharati-roots-BJP-failing

मेगाभरती मुळेच भाजपा अपयशी, प्रदेशाध्यक्षांनी केले मान्य

            विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या मेगाभरतीमुळे सगळ्याच राजकीय पक्षांना हादरे बसले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक दिग्गज नेते हे भाजपा मध्ये आल्याने भाजपची ताकद वाढली असेही म्हटल गेले. शक्तीसंचय करण्यासाठी असे नेते पक्षात घ्यावे लागतात असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन या सगळ्या मेगाभरतीचे सूत्रधार होते. पण निकालानंतर जे चित्र पुढे आले त्यामुळे ही मेगाभरती भाजपला फायद्याची ठरली नाही हे सिद्ध झाले आहे. याची कबुली खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यांच्या या विधानामुळे भाजपमध्येही त्याबाबतीत असंतोष आहे हे स्पष्ट झाले आहे.

कोण? कोण? कोण नारायण राणे बोलत उडवली राऊतांनी राणेंची खिल्ली

               पिंपरी-चिंचवड इथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात बोलताना प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो. पण थोडा बदल झाला. जो काम करतो त्याला नाही तर तो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेलीत. हे कल्चर आता उद्धवस्त करावं लागणार आहे. पाटील यांच्या या बोलण्यामुळे भाजपात गेलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्याचे राजकीय भविष्य अंधारात बुडणार असेच चित्र आता निर्माण होताना दिसून येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here