रोहित पवारांनी लावले फडणवीस सरकारवर टँकर घोटाळ्याचे आरोप

रोहित-पवारांनी-लावले-फडण-Rohit-Pawar-planted-Fadan
ads

रोहित पवारांनी लावले फडणवीस सरकारवर टँकर घोटाळ्याचे आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टँकर घोटाळ्याचे आरोप लगावले आहे. काल अहमदनगर येथे झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत या बाबतची माहिती रोहित पवार यांनी कॅबिनेट मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेली आहे. नगर येथे जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी आपल्या दालनात प्रथमच आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाधीकाऱ्यांसोबत विविध प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

बैठकीत रोहित पवार यांनी फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळ पडला असताना झालेल्या टँकर छावणी आणि इतर दुष्काळ निवारण कामांची चौकशी करण्याची मागणी केली. नगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा यासाठी मोठा निधी मागितला असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. नगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे, टँकर पाणीपुरवठा, तसेच चारा छावण्यांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार रोहित पवार यांनी केली होती. या तिन्ही आरोपांबाबत उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करणार इंदू मिलच्या जागेची पाहणी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here