“उद्धवा अजब तुझे सरकार” म्हणणारे मनसेचे देशपांडे ट्रोल

“उद्धवा अजब तुझे सरकार” म्हणणारे मनसेचे देशपांडे ट्रोल

मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे हे आता रोज ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका करत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल ८८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अश्वदलाचा समावेश करण्यात आला आहे. यानंतर अनेकांनी या निर्णयाचे कौतुक केले होते. संदीप देशपांडे यांनी मात्र ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयावर टीका करणारे ट्विट केले आहे. ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणत देशपांडेंनी टीका केली खरी, मात्र ट्विटरकरांनी उलट देशपांडे यांचीच कानउघाडणी केली आहे.

“जग घोड्यावरुन चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलीस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं. “उद्धवा अजब तुझे सरकार” असे ट्विट देशपांडे यांनी केले. २३ जानेवारी रोजी मनसेचे महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मनसे आपली स्वतंत्र विचारधारा मांडणार आहे. त्याआधीपासूनच मनसेने सरकारविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. संदीप देशपांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत सरकारवर टीका करत आहेत. मात्र ट्विटरवरील युजर्सनी यावेळी देशपांडे यांना खडे बोल सुनावले आहेत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here