Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाइट लाइफ बाबतचे मत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाइट लाइफ बाबतचे मत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामानाला दिलेल्या आपल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांची रोकठोक उत्तरे दिली. प्रदीर्घ चाललेल्या या मुलाखतीत सामनाचे संपादक राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाईट लाइफ बाबत आपले परखड मत मांडले. मुंबईतल्या कष्टकरी वर्गाला रात्रीच्यावेळी जेवणासह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणं म्हणजे नाइट लाइफ. मौजमजा, छंद, पब आणि बार असा नाइट लाइफचा अर्थ होत नाही” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी नाइट लाइफचा अर्थ उलगडून सांगितला.

मुंबईकर हा दिवसासुद्धा कष्ट करतो. तो थकूनभागून उशिरा संध्याकाळी घरी जातो. घरी जाऊन थोडासा विसावून बाहेर पडतो. तोपर्यंत सगळं बंद झालेलं असते. कुटुंबासमवेत एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे हे सुद्ध नाइट लाइफमध्ये आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले. नाइट लाइफमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, “पोलीस रात्री झोपतात हा विरोधी पक्षाचा गैरसमज आहे. विरोधी पक्ष जरी झोपत असले तरी आपला पोलीस.. खरोखर त्याला मुजराच केला पाहिजे. तो चोवीस तास जागा असतो” असे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a comment

0.0/5