वांद्रे येथील कोरोना तपासणी शिबिरात एकूण 85 पत्रकारांनी केली तपासणी, मंत्री एकनाथ शिंदेचे मानले आभार

वांद्रे येथील कोरोना तपासणी शिबिरात -At the Corona Inspection Camp at Bandra

वांद्रे येथील कोरोना तपासणी शिबिरात एकूण 85 पत्रकारांनी केली तपासणी, मंत्री एकनाथ शिंदेचे मानले आभार
राज्याचे नगरविकास मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री

एकनाथजी शिंदे यांच्या तर्फे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा खा. डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहर जिल्हा – नवी मुंबई शहर – मुंबई शहर ( चेंबूर ) नंतर आज मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरांतील फक्त फिल्ड वर कार्यरत असणाऱ्या पत्रकारांसाठी ICMR मान्यता असलेल्या खाजगी लॅब द्वारे मोफत कोरोना – कोविड 19 SWAB तपासणी शिबीर आयोजित केले होते.

आज बांद्रा येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयातील आवारात पार पडलेल्या या शिबिरात एकूण 85 पत्रकारांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कोरोना वृत्तांकन करणाऱ्या सर्व खाजगी वृत्तवाहिनीमधील पत्रकार , कॅमेरामन, वृत्त निवेदक यांचा समावेश होता. तर प्रिंट मिडिया मधील अनेक पत्रकार, उपसंपादक, वार्ताहर यांनीही आजच्या शिबिराचा लाभ घेतला.आजपर्यंत एकूण 320 पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे. तसेच

तपासणीत 6 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.यापैकी एका खाजगी वृत्तवाहिनी मधील 2 पत्रकारांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.ठाणे येथील होरीझोन हॉस्पिटलमध्ये योग्य उपचारानंतर दोघांची दुसऱ्यांदा टेस्ट नेगटीव्ह आल्याने दोघांनाही डिस्चार्ज मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here