चंद्रकांतदादांचा भाजपाशी संबंध चार वर्षांचा – एकनाथ खडसे

चंद्रकांतदादांचा भाजपाशी संबंध चा-Chandrakantdada's connection with BJP

चंद्रकांतदादांचा भाजपाशी संबंध चार वर्षांचा – एकनाथ खडसे

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर लावलेल्या घराणेशाहीच्या आरोपाचा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांचा भाजपा पक्षाशी काहीही संबंध नसून गेल्या तीन-चार वर्षांपासून ते भाजपामध्ये आले आहेत. त्यामुळे ते चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत आहेत. त्यांनीच अध्यक्षपद सोडून मार्गदर्शनाचे काम केले, तर अधिक सोयीचे होईल असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला पाटलांना लगावला आहे. काँग्रेसशी माझा कधीही दुरान्वये संबंध नव्हता, असं सांगत विधानसभेच्या वेळी मला टाळून जबरदस्तीने माझ्या मुलीला तिकीट दिल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

पुढे बोलताना खडसे म्हणाले की, गेली चाळीस वर्ष भारतीय जनता पक्षासाठी काम करतोय. चंद्रकांतदादांना बरीचशी चुकीची माहिती आहे. कारण चंद्रकांतदादा मुळात भाजपामध्ये आता आलेले आहेत. भाजपा पक्षाचा आणि त्यांचा संबंध तीन-चार वर्षांमध्ये मंत्रिमंडळात आल्यापासून झाला. यापूर्वी भाजपामध्ये ते कधीही कार्यरत नव्हते. ते विद्यार्थी परिषदमध्ये कार्यरत होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा चाळीस वर्षांचा इतिहास त्यांना जेवढा सांगितला तेवढाच ते बोलतात, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here