Skip to content Skip to footer

देशात चीन विरोधात संताप, तर दुसरीकडे केंद्राने घेतले चीनकडून कर्ज….!

देशात चीन विरोधात संताप, तर दुसरीकडे केंद्राने घेतले चीनकडून कर्ज….!

चीन-भारतीय बॉर्डरवर चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमत सुरू झालेली असताना, दुसरीकडे भारताने चीनची राजधानी बीजिंगमध्ये मुख्यालय असलेल्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून भारताला ७५० दशलक्ष डॉलर्स किमतीच्या कर्जासाठी मान्यता देण्यात आली आहे. ‘कोरोना’ व्हायरस साथीच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांना तोंड देण्यास भारताला मदत होईल, असे आशियाई बँकेने बुधवारी सांगितले.

चीन-भारत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने बीजिंगचे आर्थिक पाठबळ असलेल्या आशियाई पायाभूत सुविधा बँकेकडून आणखी ७५० दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे ५ हजार ७१४ कोटी रुपयांचे कर्ज घेत आहे. आशियाई बँकेचे भारतावर आता १.२५ अब्ज डॉलर्सचे कर्ज झाले झाले आहे. मे महिन्यात, आशियाई बँकेने भारताला कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीत मदत करण्यासाठी ५०० दशलक्ष कर्जास मान्यता दिली होती. ही दोन्ही कर्ज ही १० अब्ज डॉलर्सच्या निधी सुविधेचा भाग आहेत.

Leave a comment

0.0/5