राजगृह तोडफोड प्रकरणी एकाला अटक….

राजगृह तोडफोड प्रकरणी एक-One of the palace vandalism cases

राजगृह तोडफोड प्रकरणी एकाला अटक….

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कडक कारवाईचे आदेश पोलीस खात्याला दिले होते.

या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. हा तरुण नशेबाज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या तरुणाची कसून चौकशी सुरू असून, त्याने हे कृत्य का केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे माटुंगा पोलिसांनी म्हटले आहे. या हल्ल्यानंतर राजगृहाजवळ कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here