आमदार आशिष शेलार यांच्या टीकेला यशवंत जाधव यांचा टोला…..!

आमदार-आशिष-शेलार-यांच्या- MLA-Ashish-Shelar's

आमदार आशिष शेलार यांच्या टीकेला यशवंत जाधव यांचा टोला…..!

सध्या कोरोनाच्या संकटात विरोधी पक्षाने आपले राजकारण सुरूच ठेवले आहे. एकीकडे आघाडी सरकार राज्यावर उद्भवलेल्या अस्मानी संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे मात्र विरोधी पक्षाने आपल्या खुरापती चालूच ठेवल्या आहेत. मागील दोन दिवसापासून मुंबई पडणाऱ्या पावसावर सुद्धा भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राजकारण करत मुंबई मनपामध्ये सत्ता असलेल्या शिवसेना पक्षावर टीका केली.

आमदार शेलारांच्या या टीकेला शिवसेना उपनेते, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रतिउत्तर देत जोरदार टोला लगावला आहे. ” २० कोटी “व्हर्च्युअली” आले. १५ लाख रुपये “व्हर्च्युअली” मिळाले. महागाई “व्हर्च्युअली”कमी झाली. “अच्छे दिन” व्हर्च्युअली आले. दशहतवाद “व्हर्च्युअली” कमी झाला. पेट्रोल दर “व्हर्च्युअली” कमी झाले. बोंबा मारायला लाज नाही वाटत” अशी टीका यशवंत जाधव यांनी आमदार शेलार यांच्यावर केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here