कंगनानंतर बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी मनीष मल्होत्राला नोटीस…
अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी काल बृहन्मुंबई महानगर पालिकेने सिनेअभिनेत्री कंगना रानौत हिच्या पाली हिल येथील कार्यालयावर कारवाई केली होती. आत त्याच पाठोपाठ मुंबईतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या कार्यलायाला सुद्धा अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मनपाने नोटीस पाठवली आहे.
मनीषला पाठवलेल्या नोटीसमुळे कलाविश्वात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मनीष मल्होत्राने त्याच्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये बेकायदेशीररीत्या बांधकाम केलेले आहे. मनीषने बांधकाम करताना मनपाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केले आहे, असा आरोप मनपाने दिलेल्या नोटीसमध्ये लावला आहे. तसेच त्याला सात दिवसाच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.
दरम्यान अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कंगनाच्या कार्यालयावर काळ कारवाई करण्यात आली मात्र ह्या विषयाची प्रसारमाध्यमांवर जोरदार चर्चा झालेली दिसून आली होती. तसेच कारवाई पूर्वी तिच्या मणिकर्णिका कार्यालयाला उत्तर देण्यासाठी २४ तसाच अवधी देण्यात आला होता. मात्र उत्तर न आल्यामु