Skip to content Skip to footer

जर शिवसेनेनं ठरवलं असतं तर मोदी-शहा यांची सुरक्षा कमी पडली असती ! – विजय चोरमारे

जर शिवसेनेनं ठरवलं असतं तर मोदी-शहा यांची सुरक्षा कमी पडली असती ! – विजय चोरमारे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला आणि सरकारला उपदेश करायला लागलेत, त्यांना विचारावं लागेल की तुमचे दिल्लीतले नेते जो कुणी विरोधात जाईल त्याच्यामागं सीबीआय, ईडी पासून एनआयएपर्यंत सगळ्या यंत्रणा सोडतात. त्याला जगणं नकोसं करून सोडतात आणि तुम्ही शिवसेनेवर सुडाच्या भावनेचा आरोप करणार..धन्य आहे! फडणवीस यांनी जरा स्वतःच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीकडं, एकनाथ खडसे यांच्याकडं शांतपणे बघितलं आणि मोदी-शहांचे कारनामे आठवले तरी सुडाची भावना काय असते ते त्यांना कळेल, असा घणाघात चोरमारे यांनी केला आहे.

कंगनानं शिवसेनेवर मात केली, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी एक सांगावंसं वाटतं. आज शिवसेना सत्तेत आहे म्हणून शांत आहे. आदित्य ठाकरे यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं आणि प्रसारमाध्यमांना हाताशी धरून राळ उठवल्यानंतरही शिवसेनेनेनं अतिरेकी प्रतिक्रिया दिली नाही.

शिवसेनेविषयी गैरसमज बाळगून आहेत, त्यांच्या माहितीसाठी सांगावंसं वाटतं. आजसुद्धा शिवसेनेनं ठरवलं असतं, तर वाय सिक्युरिटीच नव्हे तर मोदी-शहांच्याकडं असलेली सगळी सिक्युरिटी दिली असती तरी उपयोग झाला नसता. मुंबईत चिटपाखरूही रस्त्यावर येऊ शकलं नसतं. कंगनानं मुंबईत आपल्या घराकडं जाणं दूरच, कंगनाला घेऊन येणारं विमानही विमानतळावर उतरू शकलं नसतं.
पण शिवसेनेनं आपली पारंपारिक शैली बदलली आहे. कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. संयम बाळगणं, कायदेशीर मार्गांचा अवलंब करणं हा जर कुणाला दुबळेपणा वाटत असेल आणि मुख्यमंत्र्यांना एकेरी संबोधणारी कंगना शूर वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत ! , अशी प्रखर टीका चोरमारे यांनी केली आहे.

Leave a comment

0.0/5