मिशन बिगिन अगेन संदर्भात ठाकरे सरकारने नव्या गाईडलाइन बुधवारी जाहीर केल्या होत्या. त्यामुळे सोमवार पासून मेट्रो सेवा पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. तर राज्यातील ग्रंथालय सुद्धा आता पूर्वरत सुरु करण्यात येणार आहेत. मात्र सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी मार्गदर्शक तत्वे, सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहे. मात्र अद्याप मंदिरे, शाळा आणि कॉलेज सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
राज्यातील सर्वच शासकीय आणि निमशासकीय ग्रंथालये कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आजपासून सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. मेट्रो रेल्वे देखील निर्देशित कार्यपद्धतीनुसार सुरू करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत.
• मेट्रो सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
• दुकानं उघडी ठेवण्याच्या वेळेत २ तासांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत दुकाने उघडी राहू शकतात.
• सर्व शासकीय आणि खाजगी लायब्ररी उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतू सामाजिक अंतर आणि स्वच्छताविषयक नियमांचे अनुसरण करणे आवश्यक असणार आहे.
• संशोधनासाठी प्रयोगशाळा, पीएचडी आणि पोस्ट ग्रॅज्युएट सायन्स कोर्स विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल सुरू करण्याची परवानगी.
• शाळा व महाविद्यालये सध्या बंदच राहणार आहेत.
• शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.
• ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा तर अंत्यसंस्काराला २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
• बिजनेस टु बिजनेस एक्जिबिशनला परवानगी देण्यात आली आहे.
• स्थानिक साप्ताहिक बाजार उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.