Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनची लागण !

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनची लागण !

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील माहिती खासदार सुनील तटकरे यांनी स्वतःहून ट्विट करून दिलेली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून तटकरे पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल झाल्याचेही त्यांनी ट्विटकरून सांगितले आहे.

“माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन” असे ट्विट तटकरे यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5