माहिम दर्ग्याच्या विश्वस्ताविरोधात बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल

माहिम-दर्ग्याच्या-विश्वस-Mahim-Dargah-Vishwas

मुंबईतील माहिम दर्ग्याचे विश्वस्त डॉ. मुदस्सर निसार यांच्याविरोधात महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मुदस्सर हे वक्फ बोर्डाचे सदस्यही आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोप झाल्यानंतर डॉ. मुदस्सर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

डॉ. मुदस्सर हे महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे सदस्य आणि माहिमच्या दर्गा ट्रस्टचे विश्वस्तही आहेत. एका महिलेनं माहिम पोलीस स्टेशनमध्ये डॉ. मुदस्सर यांच्याविरोधात याबाबत तक्रार दिली होती. लग्नाच्या आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. तसेच माहिम दर्ग्याच्या परिसरातच बलात्काराचा प्रकार घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here