केजीएफ २ चा टीझर रिलीज, दमदार अभिनयासोबत ‘रॉकी’ पुन्हा परतला

होमबेल फिल्म्स, एए फिल्म्स आणि एक्सेल एंटरटेन्मेंटकडून केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटाचा टीझर दिलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच रिलीज करण्यात आला आहे. यंदा प्रदर्शित होणारा केजीएफ २ चित्रपटाचा टीझर सुपरस्टार यशच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट स्वरूपात ८ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण तो एक दिवस आधीच रिलीज करण्यात आला आहे.

टीझरबद्दल बोलताना सुरुवातीला आपल्याला रॉकीची आई आणि तिचे बालपण दिसेल. रॉकीच्या आईने त्याला कसे वाढविले, तो कसा मोठा झाला आणि त्याने आपल्याला जे वचन दिले होते ते तो आता पूर्ण करेल. टीझरमध्ये रविना टंडन यांना खासदार म्हणून दाखवले जाऊ शकते. तर तिथेच संजय दत्त पाहायला मिळणार आहे.
अद्याप त्याचा चेहरा समोर आलेला नाही. पहिला भाग संपल्यानंतर तेथून ‘केजीएफ-२’ची सुरुवात होणार आहे. दुसऱ्या सीक्‍वेलमध्ये यशसह संजय दत्त आणि रविना टंडन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यश आणि संजय दत्त यांच्यातील संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here