मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या भाजपा पदधिकाऱ्यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी फासले काळे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह्य आणि एकेरी भाषेत टीका केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पंढरपूरमधील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळे फासले आहे. तसेच परत असे न करण्याची तंबी काटकर यांना दिलेली आहे.

सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. राज्यात शिवसेना प्रणित महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाकडून मोठया प्रमाणात अत्यंत खालच्या पातळीची टीका करण्यात येत होती. मात्र तरीही महाराष्ट्रातील असे प्रकार सुरूच होते. यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांवर होत असलेल्या टीकेला आता शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने उत्तर दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here