केंद्र सरकारकडून सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन या नव्या नियमांची घोषणा केली आहे. केंद्राकडून संपूर्ण देशात डिजिटल कॉन्टेन्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवा कायदा करण्यात आला आहे.
तसेच पुढे येणाऱ्या तीन महिन्यांत हया नव्या गाईडलाईन लागू केल्या जाणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. या नव्या गाईडलाईन्स फेसबुक – ट्विटर यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसहीत नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार यांसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्सनाही लागू असतील.
पत्रकार परिषदेत जावडेकर म्हणाले की, ‘सोशल मीडिया कंपन्यांसाठी एक प्रॉपर मॅकेनिझम असायला हवा. सोशल मीडियानं भारतात बिझनेस करावा पण डबल स्टँडर्ड चालणार नाही’ असे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले होते.
खोट्या न्युज पसरविणे तसेच सोशल मिडीया या संदर्भात एक गाईडलाइन बनवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली होती, तसेच या संदर्भात चिंता सुद्धा व्यक्त करण्यात आली होती. या माध्यमातून चुकीचे चित्रं पसरवले जातं होते. याच सोशल मीडियाचा वापर गुन्ह्यासाठी केला जात होता त्यामुळेच या सर्व फेक न्यूजवर वचक ठेवण्यासाठी नव्या गाईडलाइन जारी करण्यात आल्या आहेत.