• २१ ऑक्टोबर २०२६महाराष्ट्राच्या राजकारणात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत जरांगे यांनी केलेल्या दाव्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील कथित ‘अदृश्य शक्ती’ आणि जरांगे यांना कोणाचा पाठिंबा आहे, याची चौकशी व्हावी, अशी भूमिका सामंत यांनी मांडली आहे. नेमकं प्रकरण काय आहे?बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला की, त्यांच्या नावाचा उल्लेख करून भाजपच्या नेत्यांकडून ५०० कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे. हे पैसे आपल्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट खुलासा मागितला. तसेच, आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला.
जरांगेंच्या ५०० कोटींच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; उदय सामंत म्हणाले, पुरावे मुख्यमंत्र्यांकडे देणारताजे राजकीय वृत्त •