मराठवाडा न्यूज

समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचा एल्गार! हेक्टरी १ लाख रुपये मदतीची मागणी;

Aditya chandramani Wane
द्वारा Aditya chandramani Wane रोजी October 31, 2026

आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीच्या प्रश्नावरून समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात आमदार नितीन देशमुख सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान आमदार नितीन देशमुख यांच्यासह ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकी मागणी काय आहे?