मराठवाडा न्यूज

Champions League: रोमााविरुद्ध रियल माद्रिदचा ऐतिहासिक कमबॅक! शेवटच्या ६ मिनिटांत ३ गोल, ४-३ ने थरारक विजयChampions League 2026 : UEFA

Aditya Wane
द्वारा Aditya Wane रोजी October 15, 2026

रोमााविरुद्ध रियल माद्रिदचा ऐतिहासिक कमबॅक! शेवटच्या ६ मिनिटांत ३ गोल, ४-३ ने थरारक विजयChampions League 2026 : UEFA चॅम्पियन्स लीगमध्ये रियल माद्रिदने रोमा संघाविरुद्ध अविश्वसनीय पुनरागमन करत फुटबॉल चाहत्यांना थक्क केले. तब्बल ३-१ अशा पिछाडीवर असलेल्या माद्रिदने सामन्याच्या शेवटच्या सहा मिनिटांत तीन गोल झळकावत ४-३ असा थरारक विजय मिळवला. जोसे मॉरिन्हो यांच्या रोमा संघातील पुनरागमनाच्या पार्श्वभूमीवर हा सामना विशेष चर्चेत आला.रोमा संघाची दमदार सुरुवातस्टॅडिओ ऑलिम्पिको येथे झालेल्या या सामन्यात यजमान रोमा संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. मार्टेन डी रून याने गोल करत रोमा संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, रियल माद्रिदचा स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पे याने चॅम्पियन्स लीगमधील आपल्या १००व्या सामन्यात गोल करत संघाला बरोबरी साधून दिली.पहिल्या हाफअखेर दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते.दुसऱ्या हाफमध्ये रोमा आघाडीवरदुसऱ्या हाफच्या सुरुवातीला डॉनीएल मालेन याने अवघ्या सहा मिनिटांच्या अंतरात दोन गोल करत रोमा संघाला ३-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. या आघाडीमुळे रियल