महाराष्ट्र बुलेटिन | विशेष वृत्त
सोलापूर : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांच्यासह अनिल मुंडे आणि गोपी गंजे यांच्याविरोधात सोलापूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २०२४ मधील कथित घटनेप्रकरणी एका महिलेने तक्रार दाखल केली असून, या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, संबंधितांनी घरात घुसून मारहाण केली, विनयभंग केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे आरोप करण्यात आले आहेत. तसेच अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर आरोपही तक्रारीत नमूद असल्याचे सांगितले जात आहे.
प्लॉट, सोने आणि सहा वाहनांबाबतही गंभीर आरोप
सोलापुरात सुशील कराडसह तिघांविरोधात १४ कलमांखाली गुन्हा दाखल; पॉक्सो कायद्याचाही समावेश, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कारवाई