Skip to content Skip to footer

पुढून मागून पहिले तरी गडी पैलवान काही वाटत नाही

पुढून मागून पहिले तरी गडी पैलवान काही वाटत नाही – अमोल कोल्हे
विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांचे वाभाडे काढण्यात व्यस्थ आहे. त्यातच आता शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रचार सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे प्रचारानिमित्त नगर येथे आले असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, अंगाला तेल लावून बसलोय, समोर पैलवान नाही, पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक सभांमध्ये बोलताना अशी विधाने केली होती.

पुढे बोलताना कोल्हे यांनी ‘जर समोर पैलवान नसतील देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याठिकाणी आखाडा खणायला येतायेत का? लहानपणी आमच्यावर संस्कार होते. जर मुलगा परिक्षेत नापास झालं तर बापाला घेऊन यावं लागतं, आता ते तुम्ही समजा काय झालं अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

हे ही वाचा :-अजित पवारांचे ते पत्र वाढवणार रोहित पवारांच्या अडचणी 

अजित पवारांचे ते पत्र वाढवणार रोहित पवारांच्या अडचणी

Leave a comment

0.0/5