सांगलीत भाजपाचे अंतर्गद वाद चव्हाट्यावर, पाटील-पडळकर यांच्यात जुंपली….!
सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटात निष्किय ठरलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा या मागणीवर ठाम असलेले भाजपा खासदार संजय पाटील यांच्या या निर्णयाला त्यांच्याच पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध दर्शवत पाटलांवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सांगलीत भाजपा पक्षातील अंतर्गत वाद आता चवट्यावर आले आहेत.
लोकसभा निवडणुकीला पाटील आणि पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष साऱ्या सांगलीकांनी अनुभवाला आहे तसेच प्ररिचित सुद्धा आहे. मात्र पडळकरांनी भाजपात प्रवेश करून सुद्धा सांगलीत खासदार पाटील यांच्याबरोबर आपले सूत जुळवून घेतले नव्हते. त्यांच्यातील संघर्ष तसाच एका पक्षात असून सुद्धा धगधगत होता.
खासदार संजय पाटील यांनी कोरोनाच्या काळात प्रशासकीय यंत्रणा कमकुवत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी, आयुक्त यांची बदली करावी अशी मागणी केली होती. या मागणीला आमदार गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील यांनी कडाडून विरोध करत खासदार संजय पाटील यांच्यावरच टीका करण्यात आली.
आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्वच अधिकारी खूप चांगले काम करत आहेत. जिल्ह्याला चांगले अधिकारी मिळाले आहेत, माझा त्यांना पाठिंबा आहे. असे म्हणत खासदार पाटील यांच्या निर्णयाला कडाडून विरोध केला.