Skip to content Skip to footer

आई विरोधात उभं केलं वडिलांचे पॅनेल, हर्षवर्धन जाधव यांच्या मुलाचा राजकारणात सक्रिय प्रवेश

दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सुरवात झाली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव राजकारणात सक्रिय होत असून त्यांच्या पॅनेलची घोषणा करण्यात आलेली आहे.

हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनेलची घोषणा केली आहे. आदित्य जाधव याने रावसाहेब दानवे आणि आपली आई संजना जाधव यांच्या विरोधात पॅनेल उभं केलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निडणुकीतून रायभान जाधव यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झालेली आहे.

हर्षवर्धन जाधव यांना अटक झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र आदित्य जाधव याने राजकारणाची सर्व सूत्र हातात घेतली. त्याने राजकारण सुरु केल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तालुक्यातील जनतेला सर्वोतोपरी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे आदित्य जाधव यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5