Skip to content Skip to footer

अजय देवगण तर चमचा, शेतकरी आंदोलनावर पंजाबी गायकाचा टोला

केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या वेशीवर मागच्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहे. त्यात प्रजासत्ताक दिनी घडलेल्या घटनेमुळे सरकार-शेतकरी संघटना यांच्यातील आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यात सिनेसृष्टीमध्ये दोन गट पाहायला मिळत आहे. त्यात अभिनेता अजय देवगण यांनी केलेल्या ट्विटवर गायक जॅज धामीने रिट्वीट करत उत्तर दिले आहे. चमचा, तुझ्यासाठी आरामात बसून ट्वीट करणे सोपे आहे. फक्त एक दिवस त्या कडाक्याच्या थंडीत तुझ्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांना पाठव मग तुला समजेल की ते कोणत्या परिस्थित राहत आहेत. दु:खाची गोष्ट म्हणजे रिहानासारख्या ग्लोबल स्टारने तुमचे डोळे उघडले असे ट्विट त्याने केले आहे.

“भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध सुरु असलेल्या कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. अशा परिस्थितीत भांडण करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे” असे ट्वीट अजयने केले होते. असे ट्विट अजय देवगण याने केले होते या ट्विटला पंजाबी गायक जॅज धामीने उत्तर दिले आहे.

Leave a comment

0.0/5