Skip to content Skip to footer

कोकणवासीयांना गणेशोत्सवला गावी जाण्यासाठी एसटीने करता येणार प्रवास…

कोकणवासीयांना गणेशोत्सवला गावी जाण्यासाठी एसटीने करता येणार प्रवास…

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साजरे होणारे पुढील सर्व सण अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र राज्याच्या सीमा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याकारणामुळे गणेश उत्सवासाठी चाकरमान्यांना प्रचंड हाल सहन करावे लागणार आहे. मात्र त्यातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी गणेश उत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना खुशखबर दिलेली आहे.

यावर टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत परिवहन मंत्री यांनी गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना एसटीने प्रवास करता येणार आहे. यासाठी राज्य शासन आणि आरोग्य विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करून आपल्या आपल्या गावी जात येणार आहे, असे वक्तव्य परब यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5