Skip to content Skip to footer

भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल

भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल

सोलापूर महानगर पालिकेचे भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप पालिकेच्या एका वरिष्ठ मनपा अधिकाऱ्याने लगावला आहे . या प्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.

प्रकरण असे की, उपायुक्तांची नियुक्ती नियमबाह्य असून, ‘तुमची बदली थांबवायची असेल तर मला पाच लाख रुपये द्या. मी मागासवर्गीय समाजाचा असून तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेन’ अशा पद्धतीची धमकी देत खंडणीची मागणी उपमहापौर राजेश काळे यांनी केली आसा आरोप वरिष्ठ मनपा अधिकाऱ्याने त्यांच्यावर लावला होता.

त्याच प्रमाणे नियमबाह्य पद्धतीने काम करण्यास सांगितले असताना ते काम न झाल्याने फोनवरून गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोपही आरोप महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केला आहे. या संदर्भात पांडे यांनी काळे विरोधात तक्रार दाखल केली असून या पुढचा पोलीस तपास करत आहे.

Leave a comment

0.0/5