Skip to content Skip to footer

राज्यात लॉकडाऊन वाढला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात लॉकडाऊन वाढला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तर १७ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार आहे. राज्यात १७ मे नंतर लॉकडाऊन वाढणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. राज्यातील कोराना रुग्णांचा वाढणारा आकडा लक्षात घेता महाराष्ट्रातील लॉकडाऊन सरकार ३१ मे पर्यंत वाढवणार आहे.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

१७ मे नंतर लॉकडाऊनच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक सुरु होती. अर्थचक्र सुरु रहावं यासाठी राज्यातील आणखी किती उद्योग सुरु करता येतील याचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला.

Leave a comment

0.0/5