Skip to content Skip to footer

कोरोनाच्या युद्धात मंत्रालयातील कर्मचारी पोलिसांच्या मदतीला.

कोरोनाच्या युद्धात मंत्रालयातील कर्मचारी पोलिसांच्या मदतीला.

सध्या राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांवर प्रचंड ताण पडताना दिसत आहे. आज कोरोनाच्या संकटात पोलिस कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आज मुंबईवर तीनही बाजूनी संकट आले आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे रोजगार नसल्याने मजुरांचे मोठ्या प्रमाणत स्थलांतर होत आहे. तर तिसरीकडे संरक्षण कर्त्यांना म्हणजे पोलिसांनाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबई बऱ्यापैकी अडचणींच्या कचाट्यात सापडली आहे.

यावर गृहमंत्र्यांनी पोलिसांवरील ताण कमी करण्याचा निर्णय घेतला असून, मुंबई पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील सुमारे दीड हजार अधिकारी – कर्मचाऱ्यांची फौज उतरवणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार मंत्रालयात विविध विभागांत काम करणाऱ्या अपर सचिव आणि त्यापेक्षा खालच्या दर्जाच्या ४० वर्षांखालील कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या मदतीला पाठविण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांवरील या कामाचा ताण कमी करण्यासाठी त्यासाठी सरकारने गृह विभागाचे प्रधान (विशेष) सचिव अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त विनय चौबे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राहुल कुलकर्णी यांची एक समिती गठीत केली आहे. पोलिसांना आवश्यकतेप्रमाणे मंत्रालय तसेच सरकारच्या अन्य विभागातील ४० वर्षांच्या आतील कर्मचारी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5