Skip to content Skip to footer

पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका कृषी मंत्र्यांचे शेतकऱ्यांचे अहवान…..!

पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका कृषी मंत्र्यांचे शेतकऱ्यांचे अहवान…..!

पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप हंगाम आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, विभागीय उपसंचालक दिलीप झेंडे आदी उपस्थित होते.  

बैठकीत खते, बियाणे यांची उपलब्धता, खरीप पीक कर्ज वाटप, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांना पुन्हा कर्ज वितरण अशा विविध बाबतीत चर्चा झाली. भुसे यांनी जिल्ह्याचा खताचा पुरवठा उपलब्ध करुन दिला जाईल. मागेल त्याला शेततळे, शेततळ्याला कागद आणि इतर योजनांसाठीच्या थकित अनुदानापोटीचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5