Skip to content Skip to footer

ड्रोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर सामनातून जोरदार टीका.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज भारत दौऱ्यावर येत असून त्यांच्याबरोबर त्यांचा संपूर्ण परिवार भारत भेटीसाठी येणार आहे. परंतु ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याआधीच त्यांच्या ह्या यात्रेवर सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या “सामना” च्या अग्रलेखातून ट्रम्प यांचे भारतात स्वागत करण्यात आले आहे. परंतु त्याच बरोबर काही प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आले आहेत. ड्रोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा हा व्यापारवाढीसाठी आहे, त्यामुळे त्यांच्या भारतात येण्याने भारतातील गरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कानामात्रेचा फरक पडणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. सामनातील अग्रलेखातून शिवसेनेने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

ट्रम्प यांनी वॉशिंग्टन येथे सांगितले आहे की, मी हिंदुस्थानात भेटीसाठी जात आहे. तेथे मी नरेंद्र मोदी यांच्याशी व्यापार संदर्भात चर्चा करणार आहे. म्हणजे ट्रम हे व्यापार वाढीसाठी भारतात येणार आहे. त्यांचा भारत दौऱ्यावरील उद्धिष्ट साफ झालेले आहे. ते फक्त ३६ तासांसाठी भारतात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येथे आल्याने येथील गरीब, मध्यवर्गीय जनतेला काहीही फरक पडणार नाही. मग ट्रम यांच्या येण्याने येथील जनतेला कौतुक आणि उस्सुकता असण्याचा प्रश्न येतोच कुठे ?

नंतर मोदींच्या गुजरातमध्ये ट्रम्प यांचे स्वागत भव्य होईल याचा प्रश्नच नाही, पण ट्रम्प यांच्या भारतातील आगमनानिमित्त अहमदाबादचे रस्ते चकाचक झालेत. तिथल्या झोपड्या दिसू नयेत म्हणून त्याभोवती भिंती उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे इथे त्यांच्या आगमनाच्या उस्तुकतेऐवजी लपवाछपवीच जास्त सुरु आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच NCR आणि CAA कायद्याविरोधात ट्रम्प बोलतील अशी अशा बाळगली जात आहे. पण त्यांनी याविषयी बोलू नये कारण हा आमचा देशांतर्गत प्रश्न आहे, असा सल्ला सुद्धा ट्रम्प यांना सामनातून देण्यात आलेला आहे.

Leave a comment

0.0/5