अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज व उद्या दोन दिवसासाठी भारत भेटीसाठी येणार आहे. त्यांच्या या भेटसाइटही गुजरात सरकार आणि केंद्र सरकारने जोरदार तयारी केलेली आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधीच त्यांची भेट वादात सापडलेली आहे. त्यांच्या या भेटीवर खासदार संजय राऊतांनी टोला हणाला आहे. डोनाल्ड ट्रम्प मुंबईला आले असते तर त्यांनी पहिली गोष्ट शिवथाळीच्या स्टॉलवर जाण्याची केली असती, असं वक्तव्य राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या शिवथाळीची चर्चा आहे. सगळ्या जगाला या १० रुपयांच्या शिवथाळीचे आश्चर्य वाटत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना राज्यात आणले असते तर त्यांनी आधी शिवथाळी चाखली असती, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. डोनाल्ड ट्रम्प हे सुरुवातीला अहमदाबादला जाणार आहेत. त्यानंतर ते ताजमहल पाहण्यासाठी आग्रा येथे जाणार आहेत. दरम्यान, मोदींचा अमेरिकेत ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम झाला होता. तसाच अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.