Skip to content Skip to footer

महाराष्ट्र व मुंबईच्या स्वप्नांचे चित्र मिटले की मिटवले ?- आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अखेर केंद्राच्या आशीर्वादाने गांधीनगर, गुजरातला दिले भेट.

महाराष्ट्र व मुंबईच्या स्वप्नांचे चित्र मिटले की मिटवले ?- आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अखेर केंद्राच्या आशीर्वादाने गांधीनगर, गुजरातला दिले भेट.

मुंबई…महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाणारे शहर. येथील आर्थिक व वित्तीय क्षेत्रातील घडामोडींमुळे देशातील आर्थिक क्षेत्राला चालना मिळते. येथे असलेल्या आर्थिक क्षेत्रातल्या संधीमुळे आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात आपली पावले रोवू पाहणाऱ्यांसाठी मुंबई म्हणजे पंढरी आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मुंबईच्या याच वैशिष्ट्यामुळे येथे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभारून देशातील व महाराष्ट्रातील वित्तीय क्षेत्राला कलाटणी देण्यात येणार होती. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा म्हणजेच लंडन ते सिंगापूर यामधला मध्य म्हणजे मुंबई…त्यामुळे येथे हे केंद्र उभारण्यात येणार होते.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्रात आनंदाने स्वागत करण्यात आले. कारण या केंद्राच्या उभारणीमुळे महाराष्ट्रातील सुमारे १ लाख गरजू आणि बेरोजगार हातांना रोजगार उपलब्ध होणार होता. तसेच महाराष्ट्रासह देशात देखील अनेक आमूलाग्र बदल घडणार होते. परंतु राजकीय चढाओढीच्या कचाट्यात या प्रकल्पाची उचलबांडगी करण्यात आली. २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासूनच मोदींनी जणू महाराष्ट्राच्या पदरात पडलेले प्रकल्प गुजरातला वळवण्याचा धडाकाच लावला असल्याचे अनेकदा विविध जाणकारांनी भाष्य केले आहे.

त्यातच आता हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजे त्यातलाच एक भाग असेल, असं म्हंटल जात आहे. कारण आता हे केंद्र गुजरात मधील गांधीनगर येथे निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे मोदी पंतप्रधान देशाचे झाले असले तरी त्यांच्यात असलेलं ‘अनाकलयीन’ गुजरात प्रेम महाराष्ट्राच्या भविष्यवार टांगती तलवार घेऊन बसलंय का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Leave a comment

0.0/5