Skip to content Skip to footer

कोरोना हा मानव निर्मित, मंत्री नितीन गडकरी यांचा आरोप

कोरोना हा मानव निर्मित, मंत्री नितीन गडकरी यांचा आरोप

कोरोनाच्या वाढत्या जागतिक संकटावर आता केंद्रीय मंत्री तथा भाजपा जेष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मोठे विधान केले आहे. कोरोना हा नैसर्गिक व्हायरस नसून त्याला लॅॅबमध्ये तयार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले आहेत. एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. गडकरी म्हणाले की, कोरोना व्हायरस लॅबमधूनच आला आहे. तो नैसर्गिक नव्हे, तर कृत्रिम व्हायरस आहे. त्यामुळे आता कोरोना विषाणूसह जीवन जगण्याची कला आपण शिकली पाहिजे. असे त्यांनी वक्तव्य केले आहे.

कोरोना विषाणू प्रथम चीनच्या वुहान शहरात दिसून आला आणि त्यानंतर तो जगभरात पसरला. हा नैसर्गिक विषाणू नाही, तो प्रयोगशाळेत बनविला गेला आहे. बरेच देश कोरोनावर लस तयार करण्याचे काम करत आहेत, परंतु त्यात यश मिळालेले नाही. तसेच ते पुढे म्हणाले की, या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची आधी ओळख पटणे आवश्यक आहे. या विषाणूला तात्काळ ओळखता येईल, अशी कार्यपद्धती शोधून काढण्याची गरज आहे. कारण हा व्हायरस कृत्रिम आहे, नैसर्गिक नाही. लवकरच भारत या विषाणूवर मात करेल. भारतासह अनेक देश लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत.

Leave a comment

0.0/5