Skip to content Skip to footer

दिल्लीत मजबूत सरकार, मग काश्मीर खोऱ्यात शांततेचा चोथा का ? सामना

दिल्लीत मजबूत सरकार, मग काश्मीर खोऱ्यात शांततेचा चोथा का ? सामना

जम्मू – कश्मीर मध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. दिल्लीत इतके मजबूत सरकार असूनही कश्मीर खोर्‍यात शांततेचा चोथा का झाला आहे? ‘दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या आजोबांच्या छातीवर बसून रडणार्‍या नातवाचे चित्र ही केंद्र सरकारची नामुष्की आहे. हे चित्र देशाच्या इभ्रतीला व हिंमतबाज सरकारच्या प्रतिष्ठेला डाग लावणारे आहे’, अशी खंत शिवसेनेनं व्यक्त करत जोरदार टोला लावला आहे.

कश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात सीआरपीएफचा एक जवान शाहिद झाला. त्यातच या हल्यात परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक मारला गेला. त्यावेळी त्याचा नातू सोबत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजोबांच्या छातीवर बसून हा नातू त्यांना उठवत राहिला. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले व दहशतवादाचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला.

केंद्रातील काही मंत्र्यांनीच हे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले. त्यावरून शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या अग्रलेखातून सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘जेव्हा सरकारचा अधिकृत मंत्रीच त्याच्या ट्विटर हँडलवर अशी छायाचित्र टाकतो, तेव्हा कश्मीर खोर्‍यातील रक्तपाताची जबाबदारी सरकारवर येते. अजाण नातू मृत आजोबांना जागे करण्याचा प्रयत्न करतोय अशी विदारक छायाचित्रे आजवर फक्त सीरिया, इजिप्त, सोमालिया, अफगाणिस्तानसारख्या देशांतील विध्वंसानंतर समोर आली आहेत’, असे देखील या लेखात म्हणण्यात आले आहे.

हे चित्र प्रसिद्ध करणार्‍या केंद्रीय मंत्र्यांना एक कळायला हवे की हे चित्र म्हणजे केंद्र सरकारची नामुष्की ठरू शकेल. जवानांनी आपला जीव धोक्यात घालून आजोबांच्या छातीवर बसून रडणार्‍या नातवाला वाचविले हे खरेच, पण त्या नातवाचे भविष्य काय? सरकारकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?,’ असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

Leave a comment

0.0/5