Skip to content Skip to footer

कोरोनाग्रस्त भाजपा मुख्यमंत्र्याला सरकारी हॉस्पिटवर भरवसा नाही

कोरोनाग्रस्त भाजपा मुख्यमंत्र्याला सरकारी हॉस्पिटवर भरवसा नाही

सध्या संपूर्ण देशभरात कोरोना संसर्ग आजाराने आपले हात-पाय पसरायला सुरवात केली आहे. देशातील विविध पक्षातील नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण लागल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातच मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची बातमी सॊमर आली होती.
मात्र त्यांनी आपला इलाज सरकारी हॉस्पिटलमध्ये न करता प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये करणे अधिक सोईस्कर समजले होते. मात्र हाच धागा पकडत काँग्रेस पक्षाने भाजपावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सरकारी रुग्णालयांवर भरवसा नाही, त्यामुळेच ते खासगी रुग्णालयात दाखल झालेत’ असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भागात येणारं सरकारी हमीदिया रुग्णालय सोडून खासगी रुग्णालय स्वत:वर उपचारासाठी का निवडलं?’ असा प्रश्न काँग्रेस नेते पी सी शर्मा यांनी विचारलाय. ‘जेव्हा काँग्रेस नेते कमलनाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यावर याच हमीदिया रुग्णालयात शस्रक्रिया पार पडली होती. तेव्हा त्यांच्यापाशीही देशातील कोणत्याही बड्या खासगी हॉस्पीटलचा पर्याय असून त्यांनी सरकारी रुग्णालयाची निवड केली होती’ अशी आठवणही शर्मा यांनी यावेळी करून दिली होती.

Leave a comment

0.0/5