Skip to content Skip to footer

महाराष्ट्रातील चार हजार शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी बाईकने दिल्ली गाठणार

महाराष्ट्रातील चार हजार शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी बाईकने दिल्ली गाठणार

केंद्राने लागू केलेल्या नव्या कृषी कायदायाविरोधात मागच्या २१ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे मोदी सरकार विरोधात आंदोलन करत आहे. या संदर्भात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुद्धा झालेली आहे. मात्र अद्याप यावर तोडगा काढणे केंद्र सरकारला जमलेले नाही. त्यात आता दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महारास्त्रावातून ४ हजार शेतकरी बाईकवरून दिल्ली गाठणार आहे.

राजधानी दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. हे सर्व शेतकरी ‘ऑल इंडिया शेतकरी सभे’च्या बॅनरखाली बाईक रॅलिद्वारे दिल्लीला जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पालघर, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या या बाईक रॅलीमध्ये २५० दुचाक्यांचा समावेश असून १,२६६ किमी अंतर पार करण्यासाठी त्यांना चार दिवस लागणार आहेत. यासाठी त्यांना मध्य प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये ओलांडावी लागणार आहेत. ‘ऑल इंडिया शेतकरी सभे’चे सरचिटणीस अजित नवले यांनी या बाईक रॅलीची घोषणा केली होती. ते म्हणाले, “याद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना विरोध असल्याचे दाखवण्यात येणार आहे.

Leave a comment

0.0/5