Skip to content Skip to footer

पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला शेतकरी थाळी वाजवून करणार विरोध

केंद्राने लागू केलेल्या नव्या कृषी कायदायाविरोधात मागच्या काही दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलन करत आहे. या संदर्भत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुद्धा झालेली आहे. मात्र अद्याप यावर तोडगा काढणे मोदी सरकारला जमलेले नाही. त्यात आता कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रम येत्या २७ डिसेंबरला पार पडणार आहे. मात्र पंतप्रधानांचे हे भाषण ऐकण्याच्या तयारीत शेतकरी आंदोलक नाही आहेत. मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमावेळी शेतकरी आंदोलक थाळ्या वाजवून त्यांच्या कार्यक्रमाचा विरोध करणार आहे.

यापूर्वी, करोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान मोदींनी जनतेला थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्याच या पद्धतीचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनात करायचं ठरवलंय. ‘जेव्हापर्यंत पंतप्रधानांचा मन की बात कार्यक्रम सुरू असेल तेव्हापर्यंत लोकांनी आपल्या घरात थाळी वाजवावी’ असे म्हणत आंदोलकांनी जनतेकडेही पाठिंब्याचे आवाहन केले आहे.

Leave a comment

0.0/5