Skip to content Skip to footer

नवाब मालिकांच्या नावाला जयंत पाटलांचा विरोध का ?

येन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिनभाऊ अहिरे यांनी अध्य्क्ष पदाचा राजीनामा देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष पद रिक्त ठेवणे हे येणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीला पक्षासाठी घातक आहे म्हणून शरद पवारांनी नवाब मलीक यांना अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारावा यासाठी स्वतः फोन करून सांगितले. परंतु महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी मलिक यांच्या नावाला विरोध करून ही नियुक्ती थोडा दिवस लंबवलेली आहे अशी माहिती समोर येत आहे.

एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे नवाब मलिक मुंबईचे अध्यक्ष होऊ नयेत यासाठी राष्ट्रवादीतील एक गट मुंबईतील प्रत्येक तालुकाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून ही निवड कशी लांबवता येईल याची काळजी घेत असल्याचं देखील समजतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षावरून आता पक्षांतर्गत राजकारण रंग घेऊ लागल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून मुंबईत मागील २० वर्षांत १२ वर्षांहून अधिक काळ सचिन अहिर मुंबई अध्यक्ष होते तर १५ वर्ष जयंत पाटील हे मुंबईचे पालकमंत्री होते.

काही वर्ष मुंबईची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याही खांद्यावर होती. या तिन्ही नेत्यांनी मुंबईत पक्ष वाढणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आणि त्याचेच फलित म्हणून की काय, २० वर्षांनंतरदेखील मुंबईला पक्षातून कार्यक्षम अध्यक्ष मिळू शकलेला नाही. सचिन अहिर यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या तिसऱ्या टर्मवेळीच नवाब मलिक यांना अध्यक्षपद देण्याचे खुद्द शरद पवारांनीच मान्य केले होते. मात्र, विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच मलिक यांना पद मिळू नये असा चंगच बांधला असल्याचे राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने ‘ला सांगितले आहे.

Leave a comment

0.0/5